आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापती- पत्नीमधील वादाचे न्यायालयात प्रकरण सुरू असून या प्रकरणात सामोपचारानेे तोडगा निघाला नाही. त्यानंतर दोन्ही कुटूंब एकमेकांसमोर ठाकले आणि त्यांनी लाठीकाठीने एकमेकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पाच ते सहा जणांना दुखापत झाली असून परस्परविरोधी तक्रारींवरुन नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी दोन्ही गटातील २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी (दि. १८) घडली. नांदगाव खंडेश्वर येथील अमरावती मार्गावर प्रियदर्शिनी वसतिगृहाजवळ ही घटना घडली. पहूर येथील कुटुंबातील मुलीचा यवतमाळ जिल्ह्यातील अडगाव येथील मुलाशी विवाह झाला होता. पण काही दिवसानंतर पती-पत्नीचे कौटुंबिक वादाचे प्रकरण नांदगाव न्यायालयात सुरू आहे. १८ जून रोजी न्यायालयात तारीख होती. यावेळी समझोता न झाल्यामुळे गावाकडे जाताना दोन्ही कुटुंबात वाद झाला. यात लाठीकाठीने हल्ल चढवून मारहाण झाल्याने दोन्ही कुटुंबातील पाच ते सहा जखमी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.