आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:जुगार अड्ड्यावर धाड;‎ 17 जुगाऱ्यांवर कारवाई‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरजगाव कसबा पोलिसांनी‎ शुक्रवारी (दि. ३०) खरकलीपुरा‎ येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून‎ १७ जुगाऱ्यांवर कारवाई केली आहे.‎ या जुगाऱ्यांकडून जुगार साहित्य व‎ रोख रक्कम असा एकुण २० हजार‎ ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त‎ करण्यात आला असून‎ त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार‎ प्रतिबंधक अधिनियामान्वये कारवाई‎ करण्यात आली आहे.‎

सण-उत्सवाच्या काळात कायदा‎ व सुव्यवस्था अबाधीत राहण्याचे‎ दृष्टीने पोलिस अधीक्षक अविनाश‎ बारगळ व अपर पोलिस अधीक्षक‎ शशिकांत सातव यांनी अवैध‎ धंदयांचा समूळ नाश करण्याबाबत‎ अमरावती ग्रामीण घटकातील सर्व‎ पोलिस अधिकारी व अंमलदार‎ यांना मार्गदर्शन करून सूचना‎ निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने‎ शिरजगाव ठाण्यातील पोलिस‎ पथकाने गुप्त माहितीवरून‎ खरकलीपुरा येथील जुगारावर धाड‎ टाकली.

ही कार्यवाही अचलपूर‎ येथील उपविभागीय पोलिस‎ अधिकारी अतुलकुमार नवगिरे‎ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस‎ निरीक्षक प्रशांत गिते व पोलिस‎ अंमलदार सतीश पुनसे, सुधीर‎ राऊत, विठ्ठल मुंडे, भारत कोहळे,‎ सुनील खेरडे, अंकुश अरबट,‎ राहुल खर्चान, अमोल नंदधरणे,‎ सचिन धांडे, चालक अर्जुन परिहार‎ व अजय कुंभरे यांचे पथकाने केली‎ आहे.

बातम्या आणखी आहेत...