आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर लवकरच रेल कोच रेस्टॉरंट:निविदा प्रक्रियेला सुरुवात, 5 वर्षांसाठी राहणार करार; स्थानकावर दाखल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती रेल्वे स्थानकावर रेल कोच रेस्टाॅरेंट लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार असून यासंदर्भातील निविदा प्रक्रियेला मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे. पाच वर्षांसाठी रेल्वेचा हा करार असणार आहे. तसेच प्रवाशांना शुद्ध नाश्ता मिळावा यावर भर दिला जाणार आहे.

रेल कोच रेस्टाॅरेंट तयार करण्यासंबंधी रेल्वे मंत्रालयाचे नियोजन होते. याची माहिती मिळताच खा. नवनीत रवी राणा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत त्यांना अमरावती माॅडेल रेल्वे स्थानकाबाबत माहिती देऊन पाच वर्षाच्या कालावधीसाठी निविदेतील अटी व शर्तीनुसार रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती.

रेल्वेच्या खाद्य दर नियमावलीनुसार

खा.राणा यांची मागणी रेल मंत्रालयाने मंजूर करून देशातील रेल्वेस्थानकावर रेस्टॉरंट सुरू करण्याच्या यादीमध्ये अमरावती माॅडेल रेल्वे स्थानकाचा समावेश केला. आता लवकरच रेस्टॉरेंट सुरू होणार असून या सबंधाने हालचाली सुरू झाल्या आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खा. राणा यांना मिळालेल्या माहितीनुसार ३० ऑगस्ट रोजी रेलप्रशासनाकडून फस्ट क्लास एअरकंडीशन रेल्वे कोच रेस्टॉरेंट सुरू करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याला रेस्टॉरंटप्रमाणे तयार करण्याची प्रक्रिया खासगी कंपनीतून सुरू आहे. लवकरच रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या खाद्य दर नियमावलीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.

माॅडेल स्थानकावर मिळणार खाद्य पदार्थ

माॅडेल रेल्वे स्थानकाच्या आत कोणतेही रेस्टाॅरेंट नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत प्रवाशांना स्थानकावर खाद्य पदार्थच मिळायचे नाही. खायला काही हवे असल्यास स्वत:सोबत ते घ्यावे लागायचे. किंवा स्थानकापासून 50 ते 70 फुटाच्या अंतरावर असलेल्या रेस्टाॅरंटमधून खरेदी करावे लागायचे. अगदी चहाही मिळायचा नाही. त्यामुळे घाईत असलेल्या प्रवाशांची गैरसोय व्हायची. मात्र, रेल्वे कोच रेस्टाॅरंटमुळे प्रवाशांना स्थानकाच्या आतच आता खाद्यपदार्थ, चहा, काॅफी मिळणार आहे.

अनेक वर्षांची मागणी

प्रवाशांसह यात्री संघटना माॅडेल रेल्वे स्थानकावर रेस्टाॅरंटची आवश्यकता असल्याची मागणी करीत होते. येथे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही मिळत नव्हत्या. सर्वकाही बाहेरून किंवा घरून निघताना सोबत घ्यावे लागायचे. उन्हाळ्यात पाण्याच्या बाटल्या धावपळ करीत रेल्वे स्थानकाच्या बाहेरून न्याव्या लागायच्या. आता मात्र, स्थानकाच्या आतच रेल्वे कोच रेस्टाॅरंट सुरू होणार असल्याने त्याची आवश्यकता राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...