आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात वादळी पावसाचा फटका:मंगलकार्यालयाच्या छतावरील टिन कोसळल्याने लग्न सोहळ्यातील 10 ते 12 जणांना दुखापत

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन दर्यापूरात वादळी वारा, विजांचा कडकडात गारांचा पाऊस 15 मिनिटे सर्वत्र धो-धो बरसला. यावेळी असलेल्या वादळी पावसामुळे शहरातील एका मंगलकार्यातील सभागृहाचे टिनशेड उडाल्याने कार्यालयातील 10 ते 12 जण वऱ्हाडी जखमी झाले आहेत. पैकी 4 ते 5 जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दर्यापुर शहरातील मुर्तीजापूर रोडस्थीत राजू खंडेलवाल यांच्या मालकीचे वैभव मंगल कार्यालयात माणीक सोळंके यांच्या मुलीचा लग्न सोहळा बुधवारी सपन्न झाला. दरम्यान मंगलकार्यालयात जेवणावळी सुरु असताना जोरदार वादळीवाऱ्यात गारांचा पाऊस बरसला. वादळामुळे मंगलकार्यालयाचे टिनशेड उडून भितींचे कानेकोपरे उखडून पडले. या घटनेत लग्न सोहळ्यातील 40 जणाना दुखापत झाली. या घटनेनंतर घटनास्थळी विविध राजकीय मंडळीनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली होती. तसेच घटना सर्वत्र पसरताच वैभव मंग्लकार्यालयस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्दैवी घटनेत वर-वधु सुखरूप आहेत.

बातम्या आणखी आहेत...