आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृग नक्षत्र:जिल्ह्यात पाऊस; मोर्शी तालुक्यात वीज पडून तरुण ठार; एक गंभीर

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि. ११) दुपारी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. मोर्शी शहराला लागूनच असलेल्या जंगल परिसरात अंगावर वीज पडल्याने एका २० वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरी घटना तालुक्यातील अंबाडा गावानजीकच्या नळामानी जंगल भागात घडली. या घटनेत एक ४८ वर्षीय व्यक्ती गंभीररित्या भाजून जखमी झाला आहे. या दोन्ही घटना शनिवारी (दि. ११) घडल्या आहेत. सागर रघुनाथराव गोरे (रा. धामणगाव गढी ता. चिखलदरा) असे मृत युवकाचे नाव आहे. सागर हा मेंढ्यांचा कळप घेऊन चार ते पाच दिवसांपूर्वीच मोर्शी शहराला लागून असलेल्या करजगाव जंगल परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल, अशी माहिती मोर्शी पोलिसांनी दिली अमरावती शहरासह मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे,नांदगाव खंडेश्वर व दर्यापूर आदी तालुक्यात पाऊस झाला. बाजार समितीत व्यापाऱ्यांचा माल भिजला : धामणगाव रेल्वे शहरात शनिवारी दुपारी एक तास वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसला. बाजार समितीच्या शेतकरी यार्ड वर व्यापारी वर्गाने खरेदी केलेला शेतमाल पावसात ओला झाला आहे. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात वादळासह पाऊस; १५ झाडे, जेडी मॉलच्या काचा कोसळल्या

शहरात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जोरदार वादळ आले. यावेळी काही भागात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या जे. डी. मॉल्सच्या काचा खाली पडून फुटल्या तसेच चौदा ते पंधरा ठिकाणी झाड उन्मळून खाली पडले आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. दुपारच्या सुमारास आलेल्या हवेमुळे शहरातील नमुना गल्ली, साईनगर, लक्ष्मीनगर, हनुमाननगर, मसानगंज, रतन गंज यासह अन्य काही परिसरात चौदा ते पंधरा झाड, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून खाली पडल्या आहेत. याचवेळी वादळासोबत हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस शहरात कोसळला मात्र पावसामुळे कुठेही नुकसान नाही. दरम्यान कोसळलेले झाड व झाडांच्या फाद्यांमुळे शहरात काही मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वृत्त लिहीस्तोवर मनपाच्या अग्निशमन यंत्रणेकडून हवेमुळे खाली पडलेले झाडं हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...