आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्काम:जिल्ह्यात 12 ऑक्टो.पर्यंत वाढला पावसाचा मुक्काम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्यस्थितीमध्ये दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर ३.१ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी ते उत्तर प्रदेश मार्गे तेलंगाना, विदर्भ या भागात द्रोणीय स्थिती आहे. या कारणामुळे जिल्ह्यात ८ ते १२ ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच एक ते दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरच्या कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती व या तिन्ही दिवसात पाऊस सुरूच होता. दरम्यान ८ ऑक्टोबरपासून पाऊस राहणार नाही, अशी शक्यता असतानाच आता पुन्हा एकदा वातावरणीय बदल झाले असून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाचा मुक्काम आता १२ तारखेपर्यंत वाढला आहे.

पिकांची अशी घ्यावी काळजी: स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी सोयाबीनची परिपक्वता झाल्यास लगेच पिकाची कापणी करावी व अन्यथा शेंगा फुटणे व दाने बाहेर पडून नुकसान होते. तसेच पावसाची शक्यता असल्या कारणाने कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तसेच पावसाची शक्यता असल्याने मळणी करणे शक्य नसल्यास माल ताडपत्रीने सुरक्षित झाकून ठेवावा, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...