आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती इमारत दुर्घटना:राजेन्द्र लॉजचा मालक राहूल जैनला अटक, एक दिवसांची पोलिस कोठडी, प्रकरणातील चौथी अटक

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपुर्वी शहरातील प्रभात चौकातील राजेन्द्र लॉजची ईमारत कोसळून पाच जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी यापुर्वी तिघांना अटक केली होती. दरम्यान वर्षभरापुर्वी राजेन्द्र लॉजची ईमारत पाडली मात्र त्या ईमारतीचा ढिगारा न उचलता वरच ठेवला होता, त्यामुळे पाणी भितींत झिरपले, ते एक कारणसुध्दा रविवारी ईमारत पडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्यामुळे कोतवाली पोलिसांनी राजेन्द्र लॉजचा मालक राहूल जैनला शुक्रवारी (दि. ४) उशिरा रात्री अटक केली आहे.

राहुल राजेन्द्र जैन (४१, रा. मांगीलाल प्लॉट, अमरावती) असे राजेन्द्र लॉजच्या मालकाचे नाव आहे. मनपाने राजेन्द्र लॉजची ईमारत धोकादायक असल्याची नोटीस दिल्यामुळे मागील वर्षी राजेन्द्र लॉजच्या ताब्यात असलेली वरची ईमारत पाडली. या ईमारतीच्या खालील बाजूला पाच दुकान होती. ती मात्र पाडण्यात आली नव्हती. दरम्यान जैनने वर्षभरापुर्वी ईमारत पाडली मात्र ईमारतीचा बहूतांश ढिगारा पहील्या माळ्यावर तेव्हापासून पडून होता. दरम्यान यंदा अतिवृष्टी झाली. या मलब्यामुळे पाणी दुकानांच्या भिंतीत मुरले तसेच राजेन्द्र लॉजची ईमारत पाडताना दुकानांच्या स्लॅबसह ईतरही भितींना नुकसान झाले, असे पोलिसांनी चौकशीदरम्यान घेतलेल्या जबाबांमधून समोर आले. तसेच याच प्रकरणात शुक्रवारी सांयकाळी याच घटनेतील मृतक रवि परमार यांच्या पत्नी शिल्पी परमार यांनीसुध्दा जबाब नोंदवला होता, त्यांनीही या घटनेला ईतर दोषींसोबत राजेन्द्र लॉजचा मालक दोषी असल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण पार्श्वभूमिवर कोतवाली पोलिसांनी राहूल जैनला शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली आहे. त्याला शनिवारी (दि. ५) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहीती कोतवालीच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक निलीमा आरज यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...