आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरणाचा कार्यक्रम:रामदेवबाबांचा भाद्रपद यात्रा उत्सव आजपासून ; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

धामणगाव रेल्वे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या श्रीकृष्ण अवतार रामदेवबाबा यांच्या भाद्रपद यात्रा उत्सवाचे आयोजन मंगळवार, ६ सप्टेंबरला करण्यात आले. या निमित्ताने सकाळी ९ वाजता पालखी शोभायात्रेचे मंदिर परिसर ते अमर शहीद भगतसिंग चौकापर्यंत आयोजन केले असून, मोठ्या संख्येने भाविकांनी या वेळी दर्शन व यात्रा उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्री रामदेव बाबा मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

वर्षात माघ व भाद्रपद अशा दोन वेळी श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात यात्रा उत्सव होतो. त्यापैकी मंगळवारी भाद्रपद यात्रा उत्सव साजरा होत असून सकाळी नऊ वाजता श्री रामदेवबाबा यांची पालखी निघेल. दरम्यान या उत्सवात सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत येथील भजन गायक मुन्ना दुबे यांचा भजन व जम्मा-जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...