आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये ग्रामपंचायतीची रणधुमाळी:धामणगाव तालुक्यातील 7 पैकी 2 ग्रामपंचायतीमध्ये येणार महिला राज; 18 ला मतदान

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी असलेल्या सूचना तहसीलदारांनी प्रसिध्द केली. दरम्यान या 7 ग्रामपंचायतींपैकी अंजनवती व मलातपूर या 2 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने येथे महिला राज येणार आहे.

सात ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. दरम्यान अंजनवती येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. आष्टा, नारगावंडी व गुंजी ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता, तर गिरोली व गोकुळसरा येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय मलातपूर येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत करण्यात आले आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अंजनवती व मलातपूर या दोन ग्रा. पं.चे सरपंच पद महिलांसाठी आहे.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी दोन दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी होईल.

असे आहे सरपंपदाचे आरक्षण

ग्रा. पं. सरपंच पदाचे आरक्षण

अंजनवती सर्वसाधारण महिला

आष्टा सर्वसाधारण

गुंजी सर्वसाधारण

गिरोली नागरिकांचा मागासप्रवर्ग

गोकुळसरा नागरिकांचा मागासप्रवर्ग

नारगावंडी सर्वसाधारण

मलातपूर नामाप्र (महिला)

थेट सरपंच पदासाठी अनेकांची मोर्चेबांधणी

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागल्याने थंडीतही राजकारण तापले आहे. थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार असल्याने अनेकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. गावागावातमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने विविध चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या असून निवडणुकीमुळे भर हिवाळ्यातही वातावरण तापले असल्याचे चित्र निवडणूक जाहीर झालेल्या साम गावांमध्ये पहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...