आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी‎ देऊन तरुणीला मागितली खंडणी‎

अमरावती‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅकर असल्याचे सांगून, मित्रासोबत‎ सेल्फी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल‎ करण्याची धमकी देऊन एका तरुणीला १‎ हजार ५०० रुपयांची खंडणी मागितली.‎ ही घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीत घडली असून, या प्रकरणी पीडित‎ तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे.‎ पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित‎ मोबाइल क्रमांकाच्या धारकाविरुद्ध‎ खंडणी व विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात‎ आला आहे.‎

तरुणीच्या तक्रारीनुसार, ती‎ वसतिगृहात असताना, २८ फेब्रुवारीला‎ तिला एका अनोळखी मोबाइल‎ क्रमांकावरून संदेश आला होता.‎ त्यावेळी तिने कोण आहे, असे‎ संदेशाद्वारेच विचारले असता, संबंधित‎ मोबाइल धारकाने तरुणीला मी‎ इंटर्नशिपकरिता अर्ज केला होता.‎ त्यानंतर तू ग्रुपला अॅड झाली. त्या‎ ग्रुपमधून तुझा मोबाइल क्रमांक‎ मिळाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर‎ त्याने तरुणीशी ओळख वाढवण्यासाठी‎ प्रयत्न करुन तिला संदेश पाठवले, परंतू‎ तरुणीने उत्तर दिले नाही. दरम्यान, १‎ मार्चला दुपारच्या सुमारास तरुणीला‎ संबंधित मोबाइल क्रमांकावरून एक‎ व्हिडिओ प्राप्त झाला. त्यामध्ये ती तरुणी‎ तिच्या मित्रासोबत सेल्फी काढताना‎ दिसत होती. हा प्रकार पाहून तरुणी‎ घाबरली.

बातम्या आणखी आहेत...