आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाळराने, शेतीचा परिसर व विरळ मनु्ष्यवस्ती लगतच्या जंगलात आढळणारा दुर्मिळ नीलपंखी सरड्याचे (रंगीला सरडा) दर्शन जिल्ह्यात नुकतेच येथील वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबाडकर, विनय बढे, अमित सोनटक्के आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना झाले आहे.
महाराष्ट्रात या सरड्याचे दर्शन दुर्मिळ मानले जाते. पालीच्या आकाराचा या सरड्याला इंग्रजीमध्ये ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ असे म्हणतात. तर ‘सरडा डेक्कननेनिंस’ या शास्त्रीय नावाने हा ओळखला जातो. त्याची विशेषत: म्हणजे विणीच्या काळात नर सरड्याचा गळ्याखालचा भाग रंगीत होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी हा सरडा स्वतःच्या गळ्याखालील पोळे मागे पुढे करून आकर्षित करतो. मादीला मात्र असे रंगीत गळ्याखालील पोळे नसतात.
पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्र राज्यात याचे दर्शन दुर्मिळ आहे. या सरड्याची लांबी २२ ते २३ सेमीपर्यंत असून, आकाराने हा सरडा आकाराने आपल्या भागात आढळणाऱ्या सर्वसामान्य सरड्याच्या तुलनेत लहान असून, सूक्ष्म कीटक याचे मुख्य खाद्य आहे. साधारणत: पावसाळ्याच्या सुरवातीस हा दुर्मिळ सरडा आढळून येतो. हा सरडा भारतासाठी स्थान विशिष्ट प्रजाती म्हणून जगप्रसिद्ध आहे.
या सरड्याचे पृथ्वीवर अस्तित्व २६ लाख वर्षांपूर्वी असल्याची नोंद आहे. जग प्रसिद्ध सरीसृप तज्ञ डॉ. वरद गिरी, डॉ. दीपक वीरप्पन, मोहम्मद असिफ काझी व के.प्रवीण कारंथ यांच्या संशोधनादरम्यान त्यांना हा सरडा पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्र राज्यात आढळला नव्हता. त्यांनी संपूर्ण भारतभर तब्बल तीन हजार सहाशे किलोमीटर फिरून यावर संशोधन केले आहे.
या सरड्याच्या तब्बल पाच नवीन प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. या पाचही प्रजाती जगासाठी नवीन ठरलेल्या आहेत. अमरावती परिसरात या सरड्याच्या दर्शनाने येथील जैवविविधेतेचे महत्व पुन्हा नव्याने अधोरेखित झाले असल्याचे जाणकारांचे मत आहे.
नीलपंखी सरड्याचे दर्शन चकीत करणारे या सरड्याचे दर्शन चकित करणारे आहे. ही नोंद महत्त्वपूर्ण असून, या नोंदीसह आजवर अनेक दुर्मिळ प्रजातींचे दर्शन आपल्या भागात झाले आहे. या अनुषंगाने विदर्भातील भू स्थित परिसंस्था व कृषी परि संस्थाचे संवर्धन होणे गरजेचे वाटते.
-यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.