आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती शहरापासून जवळच असलेल्या पोहरा मालखेड जंगलात दुर्मिळ ‘मोठा ठिपकेदार गरुड’ आढळला असून त्याच्या पंखांची लांबी ६ फूट आहे. ‘ग्रेटर स्पॉटेड ईगल’ म्हणजेच मोठा ठिपकेदार गरुड असे त्याचे नाव आहे. अमरावती परिसरात तो प्रथमच आढळला. पक्षी अभ्यासक आणि वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत निकम, संकेत राजूरकर आणि कौशिक तट्टे यांना शनिवारी पक्षी निरीक्षण करताना हा पक्षी आढळला. एप्रिल ते जून हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असताे.
इंग्रजी वर्णमालेतील व्ही आकारासारखी पिसे
> सुमारे ६२ ते ७२ सेंमी लांबी असलेल्या या शिकारी पक्ष्याच्या पसरलेल्या पंखांची लांबी ५.२५ ते ६ फूट एवढी प्रचंड असते.
> गर्द काळपट तपकिरी डोके व पंखांची किनार असणाऱ्या या पक्ष्याच्या शेपटीखाली असलेली इंग्रजी ‘व्ही’ आकारातील पांढरी पिसे ही याची विशेष ओळख.
> शरीर व पंखांवरील छोटे पांढऱ्या ठिपक्यांवरून हे नाव प्राप्त झाले. क्लांगा क्लांगा हे शास्त्रीय नाव असणारा पक्षी मोठा चितळा गरुड नावानेही ओळखला जातो.
> भारताच्या उत्तर भागात निवास करताना हा गरुड हिवाळी स्थलांतराच्या शेवटच्या टप्प्यात मध्य व दक्षिण भारतात येतो. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार इत्यादी ठिकाणीही तो आढळतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.