आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने आयोजित ‘आव्हान-2022’ शिबिरात संत गाडगे बाबा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राज्यपाल भवनाचे प्रधानसचिव संतोषकुमार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. एल. माहेश्वरी, रासेयोचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत कुमार वनाजे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार रासेयोच्या स्थानिक चमूला प्रदान करण्यात आला. या यशानिमित्त रासेयोच्या सर्व सहभागी स्वयंसेवकांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्र -कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, रासेयो विभागाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार प्राप्त करुन राज्यभरात विद्यापीठाचा गौरव वाढविला, असे मत कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केले. विद्यापीठातील अधिसभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे काम सुरु आहे, लवकरच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे या केंद्रामधून मिळेल व विद्यार्थी आपत्ती व्यवस्थापनात निपुण होतील, असा विश्वासही कुलसचिवांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खरो़खरच वाखाणण्याजोगे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य अतिशय चांगल्याप्रकारे सुरू असल्याचा उल्लेख करुन प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी रासेयोचे संचालक डॉ. राजेश बुरंगे यांचेही अभिनंदन केले. वास्तविक जीवनात आणखी चांगले काम करा, ज्यामुळे त्याचा अधिक आनंद होईल, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता झाली. पुणे येथे मूळ पुरस्कार स्वीकारताना रासेयोचे पुणे येथील विभागीय संचालक डी. कार्तिगेन तसेच राज्यभरातील बावीसही विद्यापीठांचे रासेयो संचालक, कार्यक्रम अधिकारी तसेच रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
सर्व सहभागींना प्रमाणपत्रे
कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. आव्हान स्पर्धेत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक जिल्ह्यातून 25 असे 125 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष भोपळे, धनश्री भगत, रोहीत सालकुटे, प्रो. पूनम इंगळे, उमेश भदे, स्मिता देवर, बापूराव डोंगरे, निलीमा धवने, रश्मी गांजरे आणि विकास अडाळकर यांनी अथक परिश्रम घेतलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.