आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री गुरुदेव सेवा मंडळाची ध्यान व प्रार्थना ही न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यातून बंद करण्यात आली. परंतु ‘सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंती, आओ कोई भी धर्मी….. असे मानवतावादी भजन तुकडोजी महाराजांनी लिहिले आहे. त्यामुळे त्यांची प्रार्थना भोंग्यावरच हवी, यासासाठी मुस्लिम समुदायाने साकडे घातले आहे.
त्यांच्या निवेदनानुसार ‘आम्ही माननीय न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो. परंतु अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केले आहे. त्याअनुषंगाने जगाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी विचाराचा प्रचार-प्रसार होण्यासाठी ध्यान प्रार्थना आवश्यक आहे. वंदनीय महाराजांनी लिहिलेल्या ‘सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंती, आओ कोई भी धर्मी…..असे म्हटले आहे. हे त्यांचे विचार सर्वसमावेशक आहे. शिवाय देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील तुकडोजी महाराजांचा सक्रिय सहभाग होता. तुकडोजी महाराजांच्या पहाटेच्या ध्यानातून पंचक्रोशीतील लोकांची दिनचर्या सुरू होते. त्यामुळे तुकडोजी महाराजांची सामुदायिक ध्यान, प्रार्थना लाऊडस्पीकरवरुनच झाली पाहिजे’.
निवेदन हे तहसीलदार यांना सादर करण्यात आले असून, ते यावर काय निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. यावेळी शफीक शहा, अजहर शहा, समीर शेख, फिरोज शेख, शाहरुख शेख, असिफ शहा यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान, सगळीकडे भोंग्यावरून राजकारण होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंजातील मुस्लिम बांधवांच्या या सर्वधर्णसेवाभावाच्या वृत्तीचे कौतुक केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.