आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणसह विविध मागण्यांसाठी बुधवारी ‘भारत बंद’चे आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग( ओबीसी) मोर्चाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून बंदला सुरुवात झाली. यावेळी ओबीसी मोर्चाने रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला. सोबतच ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
केंद्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांची जातनिहाय जनगणना करावी तसेच ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात व ईव्हीएम बंद बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी, खासगी क्षेत्रात एस्सी, एसटी, ओबीसी वर्गाला आरक्षण लागू करण्यात यावे. त्याच सोबत एमएसपी गॅरंटी कायदा लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी. एनआरसी कायद्याविरोधात तसेच मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड ध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदारसंघ लागू करावा, कोरोना लसीकरण सक्ती करण्यात येऊ नये, लॉक डाऊन काळात बनवण्यात आलेला कामगार कायदा रद्द करण्यात यावा, या मागण्यांसाठी बुधवार (दि.२५) ‘भारत बंद’चे आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाने केले.
त्यानुसार ३१ राज्यांच्या ५६३ जिल्ह्याच्या मुख्यालयी ठिकाणी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्विन) येथून या ‘बंद’ला सुरुवात करण्यात आली. या बंद दरम्यान आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना बाजूला केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात निदर्शने केली.
यावेळी ओबीसी मोर्चा संयोजक विवेक कडू, अॅड. सुनील डोंगरदिवे, डॉ. पंच शीला मोहोड, सुनील डहाके, छत्रपती कटकतलवारे, प्रफुल्ल गवई, वंदना गोंडाणे, भारती कडू, आनंद ढोकने, राहुल मोहोड, सचिन मोहोड, अमित बनसोड, अमित लांजेवार, माधुरी भंडारे, मंगेश वानखडे, गजानन गावंडे, गजानन बोंडे, मोहम्मद गुलाम नबी, सुषमा कांबळे, रोहित मोहोड आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.