आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय स्वस्त धान्य दुकानात कार्यान्वित असलेल्या जुन्या टू-जी ई-पॉस मशीन मधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरणात येणाऱ्या अडचणीबाबत रेशन दुकानदाराकडून सातत्याने ओरड होती. त्यांची दखल घेत आता पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना लवकरच फोर जी ई -पॉस मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेत गतिमानता येणार आहे. लाभार्थ्यांना आता तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हिश्श्याचे रेशन तत्काळ मिळणार आहे. १ मे २०१८ पासून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण सुरू केले जात आहे. मात्र, याकरिता असलेल्या ई- पॉस मशिनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे त्वरित थंब इम्प्रेशन होत नव्हते.
एका शिधापत्रिका धारकाला १० ते १५ मिनिटे वेळ द्यावा लागत होता. अनेक ई-पॉस मशीन मधील सीम कार्ड निरुपयोगी झाले असून, रेशन दुकानदार मोबाइलद्वारे हॉट स्पॉट वापरून धान्य वितरण करावे लागत होत. मशीन मधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधा वाटप करताना अडचणी आल्या. या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात आता टूजीऐवजी फोर जी ई-पॉस मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात धान्य वितरणातील विस्कळीतपणामुळे अनेकदा वादही होतात.
त्यामुळे आता रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता येणार आहे. अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानात पुरवण्यात आलेल्या टू-जी ई-पॉस मशीन ऐवजी लवकरच फोर ची स्पीड असलेली ई-पॉस मशीन उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणींवर आता मात करता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांची होणारी धान्य घेण्यासाठी गर्दी आणि लांबच लांब रांग आता काही अंशी कमी होणार आहे. लवकरच याची अंमलबजाणी होणार आहे, असे पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
लाभार्थ्यांची सोय होईल
फोर-जी मशीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरु आहेत. ही यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर रेशन दुकानदारांची लाभार्थ्यांची सोय होणार आहे. - सुरेश उल्हे पाटील, स्वस्त धान्य दुकानदार वेल्फेअर संघ, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.