आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Ravi Rana Bachu Kadu's Dispute Flared Up Again, I Took 2 Steps Back After Honoring Him, Dare To Enter The House If Someone Is Breathing Ravi Rana

घरात घुसून मारण्याची हिंमत:आमदार रवी राणांचा इशारा; बच्चू कडू म्हणाले - मी कुठे यायचे ते सांगावे, मार खायला तयार!

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर ते दम देऊन बोलत असतील, तर घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. त्यांना जशास तसे उत्तर देईल. ते ज्या स्तरावर म्हणतील, त्या स्तरावर उत्तर देईन, असा इशारा आमदार रवी राणा यांनी बुधवारी बच्चू कडू यांना दिला. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

बच्चू कडू आणि माझा वाद सीएम, डेप्टी सीएम मिटवला. मी स्वःतही तो वाद मिटवला. मात्र, कुणी मला जर दम देत असेल, तर मी गप्प बसणार नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. बच्चू कडू तर छोटा विषय आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तर मी कुठे यायचे ते रवी राणांनी सांगावे. मी मार खायला तयार आहे, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

वाद पुन्हा उफाळला

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद शमला, असे चित्र असतानाच पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. प्रहार संघटनेच्या मेळाव्यात बच्चू कडू यांनी पहिली वेळ होती म्हणून माफ केले. पुढच्या वेळी प्रहारचा वार काय असेल ते दाखवेल, असा इशारा रवी राणा यांना त्यांनी दिला होता. त्यावरून पुन्हा दोघांतील वादात भर पडली आहे. त्यावरच रवी राणा यांनी बच्चू कडूंना इशारा दिला आहे.

प्रेमाच्या भाषेवर झुकेल

रवी राणा म्हणाले, प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकवेळा नव्हे दहा वेळा झुकेल. परंतु कुणी दम देत असतील तर मी घरात घुसून मारायला कमी करणार नाही. मंत्री बनने न बनने हा माझा अधिकार नाही. माझे नेते सीएम, डेप्टी सीएमचा आहे. त्यांचा आदर करून मी दोन पावले मागे आलो आणि दिलगीरी व्यक्त केली. कुणाचेही मन दुखवू नये म्हणून मी संपवला.

तुमच्यात किती हिंमत?

रवी राणा म्हणाले, वारंवार दम देत असेल की, मी रवी राणांना माफ करणार नाही. माफच काय मी त्यांना सांगतो की, तुझ्यात जेवढी हिंमत असेल ती लावा ते कसे निवडून येतील ते बघा. वेळच सांगेल की, बच्चू कडू पुन्हा आमदार होतो की, नाही ते.

ठाकरेंना धूळ खावी लागली

रवी राणा म्हणाले, उद्दव ठाकरेही आखडून राहत होते. त्यांना शेवटी मातीत धूळ खावी लागली. जे लोक आखडतात, मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्याचाही सन्मान करीत नाही. एखादा आमदार मन मोठे करून जर एक पाऊल मागे येतो पण त्यावरही दादागिरीची भाषा ते करीत असतील तर बच्चू कडू हा माझ्यासाठी छोटा विषय आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यामुळे हा विषय मी संपवला. जर ते दम देत असतील तर घरात घुसून मारू.

बच्चू कडू म्हणाले...

आमदार रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कुठे यायचे ते रवी राणांनी सांगावे. मी मार खायला तयार आहे. काल मी माझी भूमिका जाहीर केली. त्यात रवी राणांचे नाव घेऊन एकही शब्द बोललो नाही. ते जर आपल्या अंगावर घेऊन बोलत असतील, तर त्याला मी काही करू शकत नाही, अशा शब्दांत कडू यांनी रवी राणांना उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...