आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश, महालक्ष्मी उत्सवामुळे बाजारात लाखोंची उलाढाल:भाजीपाला, फळ, फुलांसह कोहळ आणि सफरचंदाची विक्रमी विक्री

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरवाशीण ज्येेष्ठा-कनिष्ठांचे शनिवारी (दि. 3) आगमन झाले. रविवारी (दि. 4) त्यांचे पूजन आहे. त्यानिमत्त त्यांना 16 भाज्या, 16 चटण्यांच्या मानसह सुग्रास भोजनाचा नैवद्य दाखविण्यात येणार आहे. मात्र गौरी, गणपती उत्सवामुळे भाजीपाला, फळ, फुलांच्या बाजारात लाखोंची उलाढाल होत आहे. पुजेसाठी फळे, फुले, तर कोहळ्याला मागणी वाढली आहे. ठाेक बाजारात फुलांचे दर गगनाला भिडले आहेत.

जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ, भाजीपाला व फुलाना फटका बसला. मात्र गौरी गणपतीमुळे पुन्हा त्यांचे दर तेजीत आले आहेत. ठोक बाजारात झेंडुची फुले 100 ते 200 रुपये, शेवंती 250 ते 500 रुपये, गुलाब 300 ते 500 रुपये, निशिंगध 250 ते 600 रुपये प्रति किलो, महालक्ष्मी पुजासाठी तयार हार 600 ते 2500 रुपये जोडी, तर जरबेरा व गुलाबाचे गुच्छ 150 ते 400 दराने विकल्या गेलेत. फळबाजारात सर्वाधिक आवक जालना येथील मोसंबी व चंदिगड, शिमला, दिल्ली येथून आलेल्या सफरचंदांची झाली असून पुजेसाठी सफरचंद, मोसंबी, डाळींब व मक्याच्या कणिसाला मागणी असल्याने त्यांचे दर वधारले असल्याचे फळ व्यावसायिक मोहम्मद आरीफ मंसुरी यांनी सांगीतले. भाजीबाजारदेखील गरमच होता. गौरी पुजनासाठी कोहळ्याच्या भाजीचा मान असताना मात्र शनिवारी बाजारा समितीत त्याची आवक केवळ 20 क्विंटलच झाली.

300 ते 350 क्विंटल कोहळ्याची आवश्यकता

महालक्ष्मी पुजनानिमित्त आज घरोघरी जेवण असते. राशीवर ठेवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये कोहळ्याचा मान असतो, तर भाजी करण्यासाठीही कोहळ्याला प्राधान्य दिले जाते. अनेकजण दोन ते तीन दिवसांपुर्वीच कोहळ्याची खरेदी करतात, तर काही जण आदल्या दिवशी व जेवणाच्या दिवशी खरेदी करता. शनिवारी कृउबासमध्ये कोहळ्याची केवळ 20 क्विंटल आवक झाली. मात्र शहरात जवळपास 300 ते 350 क्विंटल कोहळ्याची आवश्यकता असल्याची माहिती भाजीपाला व्यावसायिक विष्णु बणकर यांनी दिली.

मागणी वाढल्याने भाव तेजीत

फुल व्यावसायिक गोविंद बाखडे म्हणाले की, सध्या गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. या वर्षी पाऊस जास्त झाल्याने आवक कमी आणि मागणी जास्त आहे. त्यामुळे भाव वाढले आहे. आज महालक्ष्मी पूजनासाठी फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे अंदाजे शहरात 1 हजार मे. टन फुलांची ठोक व चिल्लर बाजारात विक्री होते.

बातम्या आणखी आहेत...