आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचे रौद्र रूप:रेकॉर्डब्रेक! अमरावती जिल्ह्यात बाधित अन् मृत्युसंख्येचाही विस्फोट, 24 तासांत 32 मृत्यू; 946 पॉझिटिव्ह

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लक्षणे दिसल्यास तत्काळ ‘आरटीपीसीआर’ करा

कोरोनाबाधीत आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्यांनी बुधवारी अमरावतीकरांचे डोळे खाड््कन उघडले. कारण या दोन्ही संख्यांनी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. वैद्यकीय प्रशासनाच्या नोंदीनुसार बुधवारी दिवसभरात ९४६ नवे रुग्ण नोंदले गेले. त्याचवेळी ३२ जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी एकाच दिवशी ९२६ रुग्ण आढळण्याचा विक्रम २३ फेब्रुवारी रोजी नोंदला गेला होता. तर २४ तासांत २६ मृत्यूचे तांडव याच महिन्याच्या १९ तारखेला अमरावतीकरांनी पाहिले होते. बुधवारच्या दोन्ही संख्या या त्याहून मोठ्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने रौद्र रुप धारण केल्यामुळे नवे रुग्ण व मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तर या संख्यांनी कमालीची उंची गाठली. पूर्वी केवळ अमरावतीमहापालिका क्षेत्रात मोठाले आकडे पहायला मिळत होते. आता स्थिती बदलली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वातावरणही स्फोटक झाले आहे. त्यामुळे मृत्यू व बाधितांच्या नोंदींमध्येही ग्रामीण भागाचा उल्लेख वारंवार होतो आहे.

दरम्यान, बुधवारी पुढे आलेल्या संख्यांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनबाधितांची संख्या ६३ हजार ८१८ वर पोचली असून आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंनीही १ हजार ३९ चा आकडा गाठला आहे. रोजच्या अशा वाढीमुळे महसूल, पोलिस, आरोग्य आणि या विभागाची धुरा हाकणाऱ्या मनपा व जिल्हा परिषद प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. मृत्यूची संख्या वाढत चालल्याने आणि सर्व मृतांवर स्थानिक पातळीवरच अंतिम संस्कार करण्याचा नियम असल्याने स्मशानातील गर्दी वाढली आहे. तर दुसरीकडे रुग्णांचा रोजचा आकडा पाहता बेड उपलब्ध करुन देणे कठीण झाले आहे. पूर्वी होम आयसोलेशनकडे नागरिकांचा कल असायचा. परंतु बहुतेक गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची गरज भासत असल्याने आता तो पर्यायही कमी नागरिकांकडून स्वीकारला जात आहे.

बुधवारचे मृतक : तब्बल ३२ मृत्यू झाल्याने अमरावतीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापैकी २४ बाधितांचा मृत्यू जिल्हा कोविड रुग्णालयात झाला असून, पीडीएमसीमध्ये तीन तर बारब्दे, भामकर (अचलपूर), सनशाईन, झेनीथ व दुर्वांकूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांमध्ये ६२ वर्षीय पुरुष, करजगाव, ४५वर्षीय महिला, बेनोडा, वरुड, ६०वर्षीय पुरुष, वणी गणेशपुर, ३४वर्षीय पुरुष, नरखेड, नागपूर, ६६ वर्षीय पुरुष, दापोरी, मोर्शी, ८०वर्षीय पुरुष, विजय कॉलनी, अमरावती, ६० वर्षीय महिला, खेड, मोर्शी, ४२ वर्षीय पुरुष, भामदेवी, कारंजालाड, ७५वर्षीय पुरुष, राजुरा, वरुड, ५२वर्षीय पुरुष, रामकृष्ण कॉलनी, अमरावती, ४७वर्षीय महिला, वरुड, ६०वर्षीय महिला, लोणी, वरुड, ५४ वर्षीय पुरुष, अमरावती, ३५ वर्षीय पुरुष, शेंदूरजना घाट, ७५ वर्षीय महिला, लोणी, वरुड, ७७ वर्षीय पुरुष, गव्हा निपाणी, ५६ वर्षीय महिला, बापटवाडी, अमरावती, ७६वर्षीय पुरुष, बेनोडा जहांगीर, अमरावती, ८० वर्षीय पुरुष, श्याम नगर, अमरावती, ३८ वर्षीय पुरुष, नागपूर, ६० वर्षीय पुरुष, नागपूर, ५७ वर्षीय महिला, नागपूर, ६७वर्षीय पुरुष, नागपूर, ६५वर्षीयपुरुष, नागपूर, ४३ वर्षीय पुरुष,

लक्षणे दिसल्यास तत्काळ ‘आरटीपीसीआर’ करा
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना प्रत्येकाने आपली तसेच कुटूंबियांची काळजी अत्यंत आवश्यक झाले आहे. ताप, घसादुखी, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास अडचण, जिभेची चव जाणे किंवा कुठलाही शारीरिक त्रास अशी लक्षणे दिसल्यास सरकारी अथवा खासगी रुग्णालयात जाऊन तत्काळ तपासणी करावी. कोरोना संबंधीची आरटीपीसीआर चाचणी करून घेत स्वत:सह कुटुंबाला व समाजाला संक्रमणापासून वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नवाल यांनी नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशन, खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करीत कोविड अॅप्रोप्रियेट बियेव्हीएअर अंगीकारावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...