आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृणास्पद:विद्यार्थिनीवर अत्याचार करुन व्हिडिओ कॉल केले रेकॉर्ड; शिकवणी घेणारा गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करुन तिचे लैंगिक शोषण केले. तसेच वारंवार तिला व्हिडिओ कॉल करुन ते आक्षेपार्ह कॉल रेकॉर्ड केल्याचे एक धक्कादायक प्रकरण नुकतेच गाडगेनगर पोलिसांसमोर आले आहे. हा प्रकार पीडित विद्यार्थिनीची शिकवणी घेणाऱ्यानेच केल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करुन हे कृत्य करणाऱ्यास २ एप्रिलला बेड्या ठोकल्या आहे.

अतुल भाष्करराव शिंदे (३८, रा. तपोवन, अमरावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अतुल शिंदे याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसात अदखलपात्र दाखल झाली होती. त्या आधारे कोतवाली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळी कोतवाली पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या पेनड्राईव्हची तपासणी केली. त्यावेळी सोळा वर्षीय पीडितेसोबत त्याने वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले. तसेच पीडितेसोबत त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ कॉल असून, ते सुद्धा रेकॉर्ड असल्याचे पेनड्राइव्हच्या पाहणीमधून समोर आले.

दरम्यान, त्याने अत्याचार केलेले घटनास्थळ हे गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. तसेच अतुल शिंदेलासुद्धा कोतवाली पोलिसांनी गाडगेनगरच्या स्वाधीन केले. प्रकरणाचे गांभीर्य व सामाजिक जबाबदारी म्हणून गाडगेनगर ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तक्रार दिली व गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी अतुल शिंदेविरुद्ध बलात्कार, पोस्को तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये २ एप्रिलला गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...