आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरीसारखे धारदार शस्त्र:मटण शिजवण्यास नकार; चुलत भावाचा केला खून

धारणी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझ्या ओल्या पार्टीसाठी मटनाची हंडी शिजवू नको, माझ्या घरात पीठ नाही….’ असे म्हणणाऱ्या चुलत भावाच्या पोटात सत्तूर (सुरीसारखे धारदार शस्त्र) खूपसून त्याला ठार मारणाऱ्यास धारणी पोलिसांकडून मोठ्या शिताफीने अटक केली. चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा येथे मंगळवार, दि.२६ जुलै रोजी दुपारी त्याने हा रक्तरंजीत थरार घडवून आणला होता.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा खेड्यात विलायती दारु व गावरान कोंबड्याची हंडी शिजवून सर्रास ओल्या पार्ट्यांचा आस्वाद घेतला जातो. याच घटनेवरुन दोन चुलत भावांमध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाच पुनर्वसन मारहाणीनंतर एकाने दुसऱ्याच्या पोटात सत्तूर खूपसून त्याचा खून करण्यात आले. मृताचे नाव जाजनू खुडी बेठेकर (३६) असून आरोपीचे नाव सखाराम बेठेकर (४२) दोघेही रा. तारुबांदा ता. चिखलदरा असे आहे. घटनेची माहिती मिळताच पीएसआय विलास राठौड, जमादार बाबुलाल दहीकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला.

या प्रकरणी भांदवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस चमूने मोठ्या शिताफीने आरोपी सखाराम बेठेकर यास गावशिवाराबाहेरुन अटक केली.

बातम्या आणखी आहेत...