आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण मंडळ:दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती अनिवार्य

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रत्येक सत्रात ७५ टक्के असणे अनिवार्य आहे.

त्यानुसार संबंधित शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती संदर्भात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सदर बाब निदर्शनास आणून द्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे

बातम्या आणखी आहेत...