आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा‎‎:संत गाडगे बाबांचा दशसूत्रीचा‎ फलक पुन्हा मंत्रालयात लावा‎; युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

अंजनगाव सुर्जी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारने तीन‎ वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या तळमजल्यावर‎ लावलेले चित्र, संत गाडगे बाबांच्या ‎ दशसूत्रीसह शिंदे-फडणवीस सरकारने‎ काढून टाकले. त्यामुळे राज्यातील तमाम ‎गाडगेबाबा विचारप्रेमींच्या भावना‎ दुखावल्या आहेत. शासनाने पुर्वीप्रमाणे तो ‎ ‎ फलक त्वरित लावावा, अन्यथा युवक‎ काँग्रेस राज्यभर आंदोलन करेल, असा‎ इशारा तहसीलदारोना दिलेल्या निवेदनाद्वारे ‎ देण्यात आला आहे.‎

गाडगे बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमासह ‎महाविकास आघाडी सरकारने लावलेली‎ चित्र नुकत्याच स्थापन झालेल्या ‎शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हटविले. त्यामुळे राज्यातील गाडगेबाबा ‎विचारप्रेमीच्या भावना दुखवल्या आहेत. ‎शासनाने तत्काळ ते फलक पुनश्चः त्या ‎जागेवर सन्मानाने स्थापन करावेत, अन्यथा‎ महाराष्ट्रातील संपूर्ण युवक काँग्रेसचे‎ पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन‎ करतील, असा इशारा तहसीलदारांना‎ दिलेल्या निवेदनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री,‎ जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना‎ देण्यात आला आहे.

निवेदन देते वेळी‎ ऋग्वेद सरोदे, अमित गोंडचवर, निखील‎ कोकाटे, सचिन वाघमारे, सलामोद्दीन‎ फईमोद्दीन, शान खान, शिवा घुसे, श्रेयस‎ राऊत, शुभम कोल्हे, निखील डाबरे, राम‎ तुरखेडे, अतीक मन्सुरी, स्वराज वानखडे,‎ निवृत्ती तुरखेडे आदींसह युवक काँग्रेसचे‎ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या‎वेळी दर्यापूर मतदार संघाचे युवक काँग्रेस‎ संघटनप्रमुख ऋग्वेद सरोदे यांनी यांनी‎ गाडगेबाबा यांची दशसूत्री पूर्ववत‎ मंत्रालयात न लावल्यास सत्ता सत्ताधारी‎ पक्षाचे आमदार, पालकमंत्री, मंत्री यांना‎ गाडगेबाबांच्या कर्मभूमीत पाय ठेवू दिला‎ जाणार नाही, असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...