आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुसंवर्धन विभागाची मोहीम:दिलासा! जिल्ह्यात ‘लम्पी’चे 92.32 टक्के लसीकरण आटोपले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी स्कीन डिसीज या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने जिल्हाभरातील लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ९२.३२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शहर व ग्रामीण भागासह जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ५० हजार गायवर्गीय पशुधनापैकी ४ लाख १५ हजार ४७४ एवढ्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लसीकरणामध्ये चिखलदरा तालुका अग्रेसर असून आतापर्यंत ४१ हजार ६५६ पशुधनाचे लसीकरण झाले आहेत.जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम मेळघाटात आढळून आला होता.

जनावरांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले जिल्ह्यात बाधित जनावरांचे प्रमाणे अधिक वाटत असले तरी बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत जिल्हाभरात ९२.३२ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित जनावरांचे लसीकरण येत्या दोन- तीन दिवसात पूर्ण होईल. पशुपालकांनी लम्पीची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास नजीकच्या पशुसंवर्धन दवाखान्यात संपर्क करावा. - डॉ. संजय कावरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

बातम्या आणखी आहेत...