आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपूर शहरातील गांधीपुलालगत १९५८ मध्ये स्थापन झालेली दीक्षाभूमी इमारत जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे या इमारतीचे नव्याने नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात यावे, यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, या मागणीसाठी भीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. निवेदनात म्हटल्यानुसार दीक्षाभूमी अचलपूर ही राज्यातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली दीक्षाभूमी बौद्ध उपासक व उपासिकांचे श्रद्धास्थान आहे. ही दीक्षाभूमी १९५८ साली स्थापन करण्यात आली. अचलपूर- परतवाडा या जुळ्या शहरातील आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान आहे.
याठिकाणी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होतात. जुळ्या शहरातून भीम जयंती, संविधान दिन, बुद्धपौर्णिमा असे विविध सण उत्सव मिरवणूक पवित्र दीक्षाभूमी येथे विसर्जित होते. अचलपूर मतदारसंघाचे आमदार यांनी आजवर दीक्षा भूमीला कोणताही निधी दिला नसल्याचे भीम ब्रिगेडचे म्हणणे आहे. दीक्षाभूमी इमारत सर्व बाजूंनी शिकस्त झाली आहे.
त्यामुळे नव्याने नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी भीम ब्रिगेडने निवेदनातून केली आहे. यावेळी अध्यक्ष राजेश वानखडे, विक्रम तसरे, प्रवीण मोहोड, अंकुश आठवले, उमेश कांबळे, नितीन काळे, शरद वाकोडे, केवल हिवराळे, कबीर सारवान, सुशील चोरपगार, अविनाश जाधव, मनोज चक्रे, गौतम सवाई, बाबाराव धूर्वे, सतीश दुर्योधन, विजय मोहोड, विजय खंडारे, राहुल तायडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.