आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे काळाच्या पडद्याआड:नाटक पाहतानाच आला हृदयविकाराचा झटका, अमरावतीकर हळहळले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारा येथील आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे (वय ७८)यांचे गुरुवारी रात्री ८ वाजता हृदयविकाराने निधन झालेे. राज्य नाट्य स्पर्धेत आज अनिल बर्वे लिखित ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता.

हा प्रयोग बघत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ झेनिथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारा, अंबागेट अमरावती येथून शुक्रवारी सकाळी 11 वाजता निघेल, त्यांच्या पश्चात 3 बहिणी, 2 भाऊ असा परिवार आहे राजाभाऊ हे अविवाहित होते. त्यांना नाट्य क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे.

अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा राजाभाऊ यांनी नाट्य चळवळ सुरू केली आणि रुजवली. त्यांनी आझाद हिंद मंडळाच्या वतीने सतत 40 वर्षे स्पर्धांमध्ये नाटक सादर केले. याशिवाय त्यांनी 100 हून अधिक नाटकं दिग्दर्शित केली. त्यांना आजवर विविध पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. नेपथ्य कलेतही ते अग्रेसर होते. याशिवाय राजाभाऊ सामाजिक, राजकीय, क्रीडा विभागातही सुद्धा सतत कार्यरत होते.

बातम्या आणखी आहेत...