आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक फटका:व्यापारी संकुलांचे भाडे रखडले; हमी घेऊन मनपाचे हात कोरडेच

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 70% गाळेधारकांनी दिले हमीपत्र; पण तीन वर्षांपासून हक्काचे उत्पन्न मिळेना

पाच व्यापारी संकुलातील ५६७ गाळेधारकांकडून वारंवार बदलत असलेल्या शासन निर्णयामुळे मनपाला गेल्या तीन वर्षांत भाडेच मिळाले नसल्याने १ रु. चौ. फुट दराचाही विचार केला तरी सरासरी एकूण वर्षाला १५ लाख यानुसार ३ वर्षांत ४५ लाख रु.चे उत्पन्न झाले नाही. भविष्यात हे भाडे वसूल केले जाणार असले तरी सध्या मनपाचे हात मात्र कोरडेच आहे.

व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांची लीज २०१८ मध्ये तर काही गाळेधारकांची लीज २०२० मध्ये संपुष्टात आली. बहुतेक गाळेधारक हे १ रु. चौ. फुट दराने भाडे देत होते. संकुलाच्या गाळ्यांची भाडेवाढ करण्याचा मनपाने ठराव केल्यानंतर व्यापारी शासनाकडे किंवा न्यायालयात गेले. त्यामुळे २५ वर्षांपासून व्यापारी अत्यल्प भाडे देत आहेत. यानंतर १९ सप्टें. २०२० मध्ये शासनाने मालमत्तेच्या ८ टक्के दराने वार्षिक भाडेवाढ करण्यासाठी समिती स्थापन केली. त्यांनीही नवे रेडीरेकनर दर सुचवले.

मात्र त्यात त्रुटी काढून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी मांडून विधानसभेत ८ टक्के भाडेवाढीला स्थगिती मिळवली. शासनानेही नवी समिती स्थापन करून त्यांच्याकडे निर्णय सोपविला.

त्यानंतर शासनाने अधिसूचना जारी करून व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून हमीपत्र भरून घेण्यास तसेच यापुढे शासनाकडून जी भाडेवाढ होईल, ती मान्य असेल असे त्यात नमूद करण्यास मनपाला सांगितले. त्यानुसार पाचही संकुलातील ५६७ गाळेधारकांपैकी आतापर्यंत ७० टक्के गाळेधारकांनी हमीपत्र भरून दिले आहे. जोवर यासंदर्भात नवीन शासन निर्णय येणार नाही, तोवर मनपाला जुन्याच भाडे-दरानुसार भाडे मिळेल.

बातम्या आणखी आहेत...