आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:भाडेतत्त्वावर औजारे, बीबीएफ पेरणीचे प्रशिक्षण ; कृषी विभागाच्या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागातर्फे प्रेमकिशोर सिकची शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातत बीबीएफ पद्धतीने पेरणी मार्गदर्शन कार्यशाळा तसेच भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्र यांचे ट्रॅक्टर चालक व संचालक, प्रतिनिधींचे प्रशिक्षण वलगाव येथे सिकची रिसॉर्टमध्ये नुकतेच झाले. त्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्पादक कंपनी,शेतकरी गट, महिला बचत गटाच्या सदस्यांनाही प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी तज्ज्ञ डॉ. के. पी सिंग, डॉ. आर. एस. राठोड या वेळी उपस्थित होते.खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यकाळातील अडचणींवर मात करता येईल, असा विश्वास कृषी सहसंचालक मुळे यांनी व्यक्त केला. या वेळी ‘पोकरा’तील विविध योजना, तसेच बीबीएफ तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत निस्ताने यांनी माहिती दिली. बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्व डॉ. राठोड यांनी सचित्र सादरीकरणातून पटवून दिले. कृषी उद्योजक व बीबीएफ यंत्राचे उत्पादक निखिल जळमकर यांनी यंत्राचा उपयोग व काळजी याची माहिती दिली. सचिन माळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे विविध उपक्रम विषद केले. वलगावच्या सरपंच मोहिनी मोहोड, उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके, गजानन कडू, मनोज जयस्वाल, राजूभाऊ जोशी, मनोज निर्मळ, नितीन मुळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...