आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:फुटलेल्या जलवाहिनीची 50 तासानंतर दुरुस्ती पूर्ण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्परवर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी रविवारी फुटली होती. दरम्यान ५० तासाच्या अविश्रांत कार्यानंतर मंगळवारी सायंकाळी चार वाजता दुरुस्ती कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता खबरदारी घेऊन मजीप्राने या जलवाहिनीमधून शहराच्या दिशेने पाणी वाहून आणने, सुरू केले आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्व काही सुस्थितीत राहिल्यास बुधवारी सायंकाळी शहरातील काही भागात पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.

शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर बोरगाव धर्माळे गावाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली होती. रविवारी दुपारी दोन वाजतापासून दुरुस्ती कार्य सुरू झाले होते. सिमेंट कॉक्रीटची जलवाहिनी बदलवून त्या ठिकाणी लोखंडी वाहिनी टाकण्यात आली आहे. ५० तासाच्या अखंडीत कामानंतर मंगळवारी सायंकाळी चार वाजता काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर एका पंपव्दारे जलवाहिनीमधून पाणी वाहून आणण्याचे काम सुरू झाले असून बारा ते चौदा तासानंतर म्हणजेच बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दुसरा, त्यानंतर काही वेळात तिसरा व नंतर चौथा असे चारही पंप चालविण्यात येणार आहे. चारही पंप सुरू झाल्यानंतर जलवाहिनीच्या स्थितीचा आढावा घेण्यात येईल, सर्व काही तांत्रिकदृष्ट्या योग्य राहिल्यास बुधवारी सायंकाळी ज्या भागाचा पाणीपुरवठा करण्याबाबत वेळापत्रक आहे, त्या भागात पाणी पुरवठा होवू शकतो, असे मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी सांगितले. दुरुस्ती कार्य सुरू असताना मागील ५० तासांपासून मजीप्राचे कार्यकारी अभियंता राजेन्द्र सावळकर, उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे, शाखा अभियंता मनोज वाकेकर, शाखा अभियंता मोरेश्वर आजने, शाखा अभियंता चंद्रकांत आकरे यांच्यासह मजीप्राचे कर्मचारी तसेच कंत्राटदार अनिल भटकर व त्यांचे पथक कार्यरत होते.

बातम्या आणखी आहेत...