आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीपासून विभक्त असलेल्या एका महिलेला विविध प्रकारचे तसेच मदत करण्याचे आमिष दाखवून तिला प्रेमजाळ्यात ओढले. त्यानंतर शहरासह बाहेर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप एका पीडितेने केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सोमवारी (दि. ८) एका चालक पोलिसाविरुध्द बलात्कार तसेच विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
चालक पोलिस अजय सरोदे (५५, रा. प्रभू कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अजय सरोदे हा शहर पोलिस आयुक्तालयातील मोटर परिवहन विभागात कार्यरत आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडिता मागील आठ ते नऊ वर्षांपासून पतीपासून विभक्त आहे. दरम्यान तीने पतीविरुद्ध स्थानिक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. काही वर्षांपूर्वी ती न्यायालयीन तारखेवर गेली असता पोलीस चालक असलेल्या अजय सरोदेसोबत तिची ओळख झाली.
त्यानंतर त्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले. अशातच मागील दिड वर्षांपासून त्याने पीडीत महिलेला लग्न करतो, खावटीचे पैसे काढून देतो, असे आमिष दाखवले. अशातच २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याने पिडित महिलेला शहरातील विवीध लॉजसह शहराबाहेरील वेगवेगळ्या लॉजवर नेले. तेथे त्याने अनेकवेळा शारिरीक शोषण केले. ते करताना त्याने स्वत:च्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रण देखील केल्याचा आरोप पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडीत महिलेने केला असून, कोतवाली पोलिस त्याबाबत तपास करत आहेत.
हा प्रकार सहनशक्ती पलिकडे गेल्यामुळे पिडीेतने सोमवारी दुपारी पोलीस आयुक्तालय गाठले. तेथे पोलिस अधिकाऱ्यांना घडलेली आपबीती सांगितली. त्यानंतर शहर कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अजय सरोदेला अटक केली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.