आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेरा पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा‎:लग्नाचे आमीष दाखवून‎ तरुणीवर वारंवार अत्याचार‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष देवून तरुणाने‎ वारंवार अत्याचार केल्याची तक्रार‎ पीडीत तरुणीने बडनेरा पोलिसांत‎ दिली. पीडितेच्या तक्रारीवरुन‎ पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या‎ तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.‎ लोकेश रामकृष्ण रताळे (रा.‎ अमरावती) असे गुन्हा दाखल‎ झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोकेश‎ रताळे आणि पीडीत तरुणीची‎ मागील काही महिन्यांपासून‎ एकमेकांसोबत ओळख आहे.‎ दरम्यान, लोकेशने तरुणीला आपण‎ लग्न करु, असे आश्वासन दिले‎ होते. काही महिन्यांपूर्वी म्हणजेच १८‎ डिसेंबर २०२२ रोजी लोकेशने‎ तरुणीला फोन करुन सांगितले की,‎ आपण दर्शनासाठी शेगावला जाऊ,‎ म्हणून तरुणी त्याच्यासोबत शेगावला‎ गेली. शेगावला गेल्यानंतर त्यांनी‎ दर्शन केले. तेथे त्याने एका लॉजवर‎ खोली भाड्याने केली. त्यावेळी त्याने‎ बलात्कार केला. त्यानंतर‎ अमरावतीत परत आल्यानंतर‎ अनेकदा त्याने स्वत:च्या घरी कोणी‎ नसताना वारंवार बलात्कार केला.‎ दरम्यान, त्याता लग्नासाठी त्याला‎ म्हटले असता तो उडवाउडवीची‎ उत्तरे दिली,असे पीडितेने दिलेल्या‎ तक्रारीत म्हटले आहे.‎