आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलनेस सेंटर:मनपाच्या हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटरसाठी 48 कर्मचाऱ्यांची आवश्यकता

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाने शहरात १२ हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर्ससाठी जागा निश्चित केल्या असून त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. या ठिकाणी मनुष्यबळाचीही नियुक्ती होणार असून १२ ही सेंटर्ससाठी प्रत्येकी ४ यानुसार ४८ डाॅक्टर, परिचारिका, एएनएम व अटेंडंट अशी चौघांची नियुक्ती होणार आहे. यासंदर्भात जाहिरात काढण्यात आली आहे.

मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये सध्या शासकीय योजना राबवण्यासोबतच साथरोग व सर्दी खोकला, ताप यासारख्या आजारावर उपचार केले जातात. तसेच गर्भवती महिलांना तज्ज्ञांद्वारे सल्ला व औषध दिले जाते. फारतर इंजेक्शन देण्याइतपत या दवाखान्यांमध्ये सोय आहे. कोणताही गंभीर रुग्ण असेल तर त्याला शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. किंवा तो रुग्ण स्वत:च्या ऐपतीनुसार खासगी रुग्णालयात उपचार घेतो.

गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठवले जाते. या ठिकाणी जखमेवर टाके देण्याचीही सोय नाही. मात्र आता शहरात १२ हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून मधुमेहाचे रुग्ण तसेच हृदयरुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. इतरही आजारांवर उपचार होतील. मधुमेह आणि हृदयरुग्णांना सल्ला, खानपान, व्यायाम, औषधोपचार येथे दिले जातील. प्राथमिक लक्षणं असतील तर त्याची तपासणी करून तत्काळ उपचार, खबरदारीबाबत सांगितले जाईल, अशी माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. विशाल काळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...