आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:नांदगाव नगर पंचायतीचे आरक्षण निश्चित, महिलांसाठी 9 जागा

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आगामी काळात होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील वार्डांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. सोमवारी दुपारी २ वाजता जुने तहसिल कार्यालय येथे आरक्षणाची ही सोडत काढण्यात आली. येथील १७ प्रभागांपैकी (वार्ड) नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यापैकी प्रभाग एक हा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी असेल तर प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जातीच्या महिला, पुरुषांपैकी कुणालाही निवडणूक लढता येईल, असे आरक्षणानंतरचे चित्र आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक ३ एसटीकरीता आरक्षित झाला आहे. याशिवाय प्रभाग क्र ४, प्रभाग क्र. ६, प्रभाग ७, प्रभाग क्र.८, प्रभाग क्र. ११, प्रभाग क्र. १४, प्रभाग क्र. १६ आणि प्रभाग क्र. १७ सर्वसाधारण महिला प्र वर्गाकरता आरक्षित करण्यात आला आहे. त्याचवेळी प्रभाग क्र ५, प्रभाग क्र ९, प्रभाग १०, प्रभाग क्रमांक १२, प्रभाग क्र १३ व प्रभाग क्रमांक १५ खुला आहे. सदर आरक्षण सोडत दोन लहान मुलांच्या हस्ते चिट्ठ्या काढून करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार पुरुषोत्तम भूसारी, मुख्य अधिकारी करीश्मा वैद्य आदींची उपस्थिती होती. लेखाधिकारी स्वप्निल बनसोड, अभिजीत लोखंडे, आशिष ढवळे, संजय चौधरकर यांच्यासह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकही यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...