आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:नऊ नगरपालिका, दोन पंचायतींचे आरक्षण जाहीर ; अनेकांची पंचाईत

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. दोन सदस्य पद्धतीने १० प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. नगर परिषदेत एकूण १० प्रभाग असून, सदस्य संख्या २० एवढी निर्धारित केली आहे. यातील ५० टक्के आरक्षणावरून १० महिला उमेदवारांना अधिकार प्राप्त झाले आहेत. नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीला महसूल विभागाचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, तहसीलदार प्रदीप शेलार व मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे उपस्थित होते. यातील प्रभाग क्रमांक २ (अ) व प्रभाग क्रमांक ६ (अ) सुद्धा अनुसूचित जाती महिलाकरिता, प्रभाग क्रमांक १० (अ) अनुसूचित जातीकरिता, प्रभाग क्रमांक ९ (अ) अनुसूचित जमाती महिलाकरिता आरक्षित झाले आहे. प्रभाग क्रमांक २ (अ) व प्रभाग क्रमांक ६ (अ) या दोन्ही अनुसूचित जाती महिलाकरिता आता आरक्षित असल्याने या दोन जागा ईश्वर चिठ्ठीने घोषित झाल्या आहेत.

नगर पालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षणासंबंधी पालिकेच्या सभागृहात सोमवार, १३ जून राेजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ दानडे, मो. हमजा मो. नदीम, अशमीरा सदफ शेख आरिफ या तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध प्रभागांच्या चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे, नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार फक्त प्रभाग क्रमांक ७ मधून ३ उमेदवार निवडून द्यावयाचे आहे, तर इतर प्रभागाचे २ उमेदवार प्रतिनिधीत्व करतील. नवीन रचनेत १२ प्रभाग अन् २५ नगरसेवक असणार आहेत. पीठासीन अधिकारी यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक राहुल देशमुख, शिक्षक अब्दुल बासीत यांनी केले.

धारणी अमरावती जिल्ह्यातील चारही नगर पंचायतींच्या निवडणुकीप्रसंगी येथील नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती, परंतु ती सदोष असल्याने तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयाेगाकडे पाठवला होता, त्यामुळे ही निवडणूक टळली होती. परंतु सोमवारी त्यासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण १७ प्रभागांसाठी ही निवडणूक होणार असून १७ पैकी नऊ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

नगरपालिकेची सोडत पालिकेच्या स्व. सुरेशचंद्र भावे सभागृह येथे पीठासीन अधिकारी मनोज लोणारकर व मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्या उपस्थितीत पार पडली. मयूर रोडे या १२ वर्षीय मुलाच्या हाताने सोडत िचठ्ठ्या काढण्यात आल्यात. इतर मागासवर्गाच्या प्रवर्गाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी असलेल्या हक्काच्या ७ जागा गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सोडतीने कहीं खुशी, कहीं गम दिसून येत आहे. नगरपालिकेत एकूण १४ प्रभाग असून एका प्रभागात २ नगरसेवक राहतील. लोकसंख्येनुसार ३ जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित असून, प्रभाग क्रमांक ७ (अ) अनुसूचित जाती, ३ (अ) व १० (अ) अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित झाले. तर २५ नगरसेवक पद सर्वसाधारण राहणार आहेत. प्रभाग ७ मधील गट (ब) व इतर १३ ही प्रभागातील गट (अ) सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित आहेत.

बातम्या आणखी आहेत...