आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:लोकांच्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करा : आ. पोटे

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध समस्या व नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल मिळालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आ. प्रवीण पोटे यांनी बुधवारी महानगर पालिकेत घेतलेल्या बैठकीत शहरवासीयांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ही बैठक विविध विभागाशी संबंधित विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. मनपाकडे बांधकाम परवानगीची अनेक प्रकरणे प्रलंबित असून ती त्वरीत निकाली काढण्यात यावी. विजेची बचत करणे गरजेचे असून यासाठी सोलर प्रोजेक्ट सुरू करावा त्यासाठी सहकार्य केले जाईल असे आ. पोटे म्हणाले.

शौचालयाचे टाके साफ करण्यासाठी नागरिक महानगर पालिकेकडे पावती फाडतात. पण त्यांचे काम त्वरीत होत नाही. त्यामुळे हे काम त्वरीत होणे गरजेचे असून या संदर्भातील कारवाई लवकर करावी. शहरातील स्वच्छतेविषयी अनेक तक्रारी प्राप्त होत असून त्यांचा त्वरीत निपटारा करावा. शहरातील विविध भागात खोके वाटप करण्यात आले असून ज्या कामासाठी ते खोके दिले आहेत, त्याच कामासाठी ते वापरले गेले पाहिजे. हॉकर्स झोनचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी. बगीच्याचे कंत्राट स्थ‍ानिक सुक्षिशित बेरोजगारांना देण्यात यावे. महानगरपालिकेने स्वत:चा टोल फ्री क्रमांक जाहीर करून नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था करावी. नागरिकांना सेवा देणे महानगरपालिकेचे कर्तव्य असल्याची सूचना आमदारांनी केली. शहरातील विविध भागात कचरा टाकण्यासाठी नवीन कंटेनरची व्यवस्था करावी तसेच व्यावसायिकांना डस्टबिन ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न करावेत. शिक्षण विभागाने पुढाकार घेवून शाळेचे आधुनिकीकरण करावे, अशा सूचना आ. पोटे यांनी केल्या. महानगरपालिकेला कोणतेही सहकार्य लागल्यास ते करण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बैठकीला आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, उपायुक्त सुरेश पाटील, उपायुक्त डॉ. सीमा नैताम, मुख्य लेखापरीक्षक राम चव्हाण, मुख्यालेखाधिकारी हेमंत ठाकरे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, शहर अभियंता रवींद्र पवार, तांत्रिक सल्लागार जीवन सदार, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, नंदकिशोर तिखिले, तौसिफ काझी, भाग्यश्री बोरेकर, शिक्षणाधिकारी डॉ.अब्दुल राजीक, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...