आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Restore Water Supply In Two Days, Otherwise Warning Of Intense Agitation; Residents Of Gopalnagar Hit Majipra, Ghagari Exploded In The Engineer's Room |marathi News

दीड तास ठिय्या:दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; गोपालनगरवासियांची मजीप्रावर धडक, अभियंत्यांच्या दालनात फोडल्या घागरी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणी प्रश्न पेटला आहे. सोमवारी शहरातील गोपाल नगर सह इतर परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर रोष व्यक्त करीत मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांच्या दालनात सोबत आणलेले खाली घागर, मडकी फोडून रोष व्यक्त केला. तसेच दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. शहरातील गोपाल नगर परिसरात भीषण पाणी टंचाई चा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हीच परिस्थिती इतरही भागाची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अमरावती शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गोपाल नगर, जेवड नगर, महावीर नगर सूतगिरणी परिसर आदी ठिकाणी नळांना पाणीच येत नाही. तासन तास पाण्यासाठी वाट पहावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच पाण्याची वेळही निश्चित नाही. त्यामुळे रात्रीचे अकरा, बारा तर कधी कधी मध्यरात्री नळ येतात. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. गोपाल नगर परिसरातील मायानगर येथील पाण्याच्या टाकीत पुरेशे पाणी साठवल्या जात नसल्याने नळाला पाणीच येत नसल्याचेही नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली असून नागरिक हैराण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कुंभकर्ण झोपेत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या माजी नगरसेविका सुमती ढोके, भाजपचे माजी नगरसेवक सुनील काळे यांच्या नेतृवात दीडशे ते दोनशे नागरिकांनी मजीप्रावर धडक दिली. यावेळी संतप्त महिलांनी सोबत आणलेल्या घागर, मडकी मजीप्रा अभियंत्यांच्या दालनात फोडून रोष व्यक्त केला. तसेच मजीप्रा विरोधात तीव्र नारेबाजीही करण्यात आली.

यावेळी दिनेश सोनवाल, अरून घुरडे, संदीप कुटारीया, नरेंद्र खंडार, सुधाकर किरसान, ज्ञानेश्वर घुले, सुनील तिरमारे, अजय पेठे, रवींद्र चौधरी, रितेश काळे, सुरेश बोरकर, स्वप्नील ढोके, विशाल निघोट, शुभम कराळे, रेणू बाळापुरे, लक्ष्मी न8निघोट, शारदा कारमोरे, दीक्षा कडू, सरिता वासनिक, शीला ढेकळे, रंजना शिरभाते, रेखा भोरे, लक्ष्मी बिसरे, नंदा भुरघाटे, शालू गणवीर, पुष्पा गणवीर,पंचफुला घायर, शोभा ढोबळे, वर्षा चांभारे, ज्योती चांभारे, माधुरी पांडे, अनिता सूर्यवंशी, शुभांगी जोशी, सुनीता पेठे, मालती घोडमारे, प्राणिता तिडके सह परिसरातील नागरीक उपस्थित होते.

कार्यालायात दीड तास केले ठिय्या आंदोलन
पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने शहरातील गोपाल नगर, सूत गिरणी परिसर, महावीर नगर, ऋषीदेव नगर, आदर्श नगर, जेवडनगर, नरसिह कॉलनी येथील दीडशे ते दोनशे महिला आणि पुरुषांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरा नळ येत असल्याने जागे राहावे लागले, तसेच नळ आहे पण नळाला पाणीच येत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे तासन तास उभे राहावे लागत असल्याचे नागरिक म्हणाले. पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशात माजी नगरसेविका सुमती ढोके यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...