आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 तासांनंतर अमरावती पदवीधरचा निकाल जाहीर:'मविआ'चे धीरज लिंगाडे विजयी, फडणवीसांचे निकटवर्तीय रणजित पाटील पराभूत

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडूनही अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नव्हता. आता 30 तासांनंतर अमरावती पदवीधरचा निकाल जाहीर झालेला आहे. 'महाविकास आघाडी'चे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. मात्र अधिकृत घोषणा अजून बाकी आहे.

अवैध मतांच्या मोजणीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पुढे होते. त्यामुळे अमरावतीत मतमोजणीवरुन राजकीय नाट्य रंगल्याचे दिसून आले. धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी एकूण 46 हजार 344 मते मिळवली आहेत. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये धिरज लिंगाडे यांना आघाडी मिळाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव झाला. कोटा पूर्ण केला नाही पण मते अधिक असल्याने धिरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत.

संपूर्ण राज्याचे होते लक्ष

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत होती. काल दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मतांनी आघाडीवर होते. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. आज सकाळी पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे या मतमोजणीत कुणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

फेर मतमोजणीची मागणी

अमरावतीमध्ये एकूण मतमोजणीमध्ये 8 हजार 735 मते अवैध ठरली असून, महत्वाची बाब म्हणजे जवळपास 4 हजारांच्यावर मतदारांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे केवळ 2 हा क्रमांक लिहून मतदान केले. या चार हजार अवैध मतांचा फटका मात्र भाजप उमेदवार रणजित पाटील यांना बसला. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.

ऐवढी अवैध मते मिळाली

8 हजार 735 अवैध मतांमध्ये 348 मते वैध झाली. यामध्ये धिरज लिंगाडे यांना 177 तर डॉ. रणजित पाटील यांना 145 मते मिळाली. फेरमोजणीनंतर डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार धिरज लिंगाडे यांना 43 हजार 517 मते मिळाली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 2 हजार 346 मतांनी आघाडीवर होते.

बातम्या आणखी आहेत...