आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ढाकुलगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद नाहे यांच्या निवृत्तीनिमित्त नुकताच निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ढाकुलगाव येथील ज्येष्ठ नागरिक माकोडे गुरुजी, तर प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच प्रभाकर भुरभुरे, उपसरपंच विजय कांडलकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर तितरे, मीना ठवकर, अनिता उभाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास मोकलकर, पोलिस पाटील महेश म्हात्रे उपस्थित होते.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर, अजय बावणे, गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती शेषरावजी चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी अरविंद नाहे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय नागरीकर, तर आभार प्रदर्शन भारती बोबडे यांनी केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.