आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन‎:कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय व‎ सनराइज स्कूलमध्ये स्नेहसंमेलन‎

तिवसाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक कृष्णाबाई दंडाळे कन्या‎ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच‎ सनराईज इंग्लिश स्कूलच्या संयुक्त सहकार्याने‎ आयोजित स्नेहसंमेलनाचे उद््घाटन ४ जानेवारी रोजी‎ थाटात पार पडले.

गंगाधर दंडाळे यांच्या‎ अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला‎ उद््घाटक म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत‎ राठी, कापूस पणन महासंघाच्या संचालिका छाया‎ दंडाळे, बाबाराव दंडाळे, विद्याधर दंडाळे, प्रमिला‎ दंडाळे, विलास इंगोले, शाळा समितीचे सदस्य‎ प्रभाकर नांदुरकर, मुख्याध्यापिका एम. टी. फाले,‎ पर्यवेक्षक जी. डी.वानखडे, सनराईज इंग्लिश‎ स्कूलचे कार्यकारी संचालक विश्वजित दंडाळे,‎ मुख्याध्यापिका रजनी माहोरे, जयश्री नवले तसेच‎ डॉ. विजय देवळे, अरुण इंगोले, एस. आर. पटवर्धन‎ उपस्थित होते. शनिवारी (दि. ७) स्नेहसंमेलनाची‎ सांगता होईल. उद््घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ प्रा. सुनील बुरघाटे, तर आभार प्रदर्शन प्रा. नीलेश‎ माहोरे यांनी केले. प्रा. जयश्री सोनारे यांच्या‎ पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.‎

बातम्या आणखी आहेत...