आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत निवडणूक आयोगाच्या सुचना:पदवीधरांच्या मतदार याद्यांचे 1 ऑक्टोबरपासून पुनरिक्षण

​​​​​​​अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाने ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्रानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्यासंदर्भात सुधारित सर्वसमावेशक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करायच्या आहेत. तसेच १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक व अमरावती विभागातील पदवीधर व औरंगाबाद, नागपूर व कोंकण विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख १ ऑक्टोबर २०२२ आहे. वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुर्नप्रसिद्धी १५ऑक्टोबर २०२२, वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिद्धी २५ ऑक्टोबर २०२२, नमूना १८ किंवा १९ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर २०२२, हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई १९ नोव्हेंबर २०२२ आहे. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी २३ नोव्हेंबर २०२२, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याची तारीख व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे २५ डिसेंबर, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० डिसेंबर २०२२ आहे.

भारत निवडणूक आयोगाचे निर्देश व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात यावे, असे संजय पवार, उप आयुक्त (सा.प्र.) अमरावती यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...