आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानद्यांमधून विषारी पाणी नव्हे, तर अमृततुल्य पाणी वाहिले पाहिजे, यासाठी नद्या पुनर्जीवित होणे ही काळाची गरज असल्याचे मत उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासन व लोकसहभागातून सुरू झालेल्या ‘चला जाणुया नदीला’ या अभियानांतर्गत दर्यापूर येथे आयोजित आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लोणारकर बोलत होते. या अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३ नद्यांची निवड राज्य शासनाने केली आहे. त्यामध्ये चिखलदरा येथे उगम झालेली व पुढे अचलपूर, अंजनगाव व दर्यापूर या तालुक्यातून वाहत अकाेला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवा (मेळ) येथे तापी खोऱ्यातील पुर्णा नदीस जाऊन मिळणाऱ्या चंद्रभागा नदीचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बैठकीत चंद्रभागा नदीचे नोडल अधिकारी म्हणून एसडीओ मनोज लोणारकर व अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रभागा व तिच्या उपनद्या, नाल्या, ओढ्यांचे पुनर्जीवन म्हणजे केवळ त्यांचे खोलीकरण वा स्वच्छता नव्हे, तर या नद्या अस्वच्छ, प्रदूषित होण्यामागील कारणांचा शोध घेत ती कारणे समाज व प्रशासकीय यंत्रणांनी हातात हात घेऊन दूर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रभागा नदीचे समन्वयक व श्रमराज्यचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी या बैठकीला संबोधीत करताना केले.
बैठकीला उपविभागीय जल संधारण अधिकारी वानखडे, मयुर कराळे, गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, विनोद खेडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सी. जे. ढवक, गट शिक्षणाधिकारी डाॅ. सुधीर डोंगरे, विरेंद्र तराळे, सुनील स्वर्गीय, ए. एस. वाघमारे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. हुड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र राहाटे, रामकृष्ण महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश म्हस्के, जे. डी. पाटील महाविद्यालयाचे प्रा. राहुल सावरकर, राधाबाई संगई महाविद्यालयाचे प्रा. केशव माकोडे, कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. व्ही. आर. राठोड, जल वृक्ष चळवळीचे विजय विल्हेकर, गोवर्धनसिंग शेखावत, लोकजागर चळवळीचे आनंद संगई, देवानंद महल्ले, संजय धारस्कर आदींनी सहभाग नोंदवला. यशस्वीतेसाठी दर्यापूर येथील उपविभागीय कार्यालयाचे बंटी कावरे आदींनी सहकार्य केले.
दर्यापूर येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना एसडीओ मनोज लोणारकर व उपस्थित चंद्रभागा नदीचे समन्वयक अरविंद नळकांडे व इतर.नदी संवाद यात्रेचे आयोजन याआढावा बैठकीनंतर चंद्रभागा नदीचे समन्वयक अरविंद नळकांडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी चंद्रभागा नदी संवाद यात्रेच्या शुभारंभाची घोषणा केली. प्रथम टप्प्याच्या या संवाद यात्रेचा समारोप सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारी रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.