आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जीवनज्योती, चैतन्य किरण नगर, प्रभा कॉलनी ते दस्तूर नगर चौका पर्यंतच्या परिसरात कोणत्याही प्रकारची मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात येऊ नये, या मागणीला घेऊन शुक्रवारी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटल्यानुसार, जीवन ज्योती कॉलनी येथे प्लॉट क्रमांक अकरामध्ये एक भाग जयस्वाल व्यक्तीकडे आहे.
त्या जागेवर बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी चिल्लर मद्य विक्रीचे दुकान सुरू होण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सुरूवातीला याच परिसरात वाइन शॉपी, बार, मद्य विक्रीचे दुकाने सुरू असल्याने आधीच परिसरात नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. या परिसरात नागरी वस्ती असून, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, वसतिगृहही याच परिसरात आहे.
दोन तीन वर्षाच्या कालावधी हत्या सारख्या गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या मद्यविक्रीमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक ते दीड किलोमीटर परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या मद्यविक्रीस परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यावेळी रामकृष्ण हिरुळकर, कोकिळा देवळे, देविदास देवळे, अभिजित घाटे, सुरेंद्र खंडेलवाल, नरेंद्र पाल, संजय पाल, कमलकिशोर गुप्ता, कैलास लोणारे, रोहित पाल आदी उपस्थित होते. आगामी काळात आंदोलन : चैतन्य कॉलनी ते दस्तुर नगर चौकापर्यंत मोठया प्रमाणावर वर्दळ असते. यासोबतच महिला, विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे या परिसरात कोणत्याही प्रकारचे मद्यविक्रीच्या दुकानांची परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.