आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व जगातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी ३५० वर्षांपासून आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय राहिला आहे. संभाजी महाराजांचे कार्य सर्वसामान्य माणसाला कळावे यासाठी अजय लेंडे यांनी २५० वर्षांपूर्वीचे छ. संभाजी महाराज रचित “श्री बुधभूषणम’ या संस्कृत ग्रंथाचे पुनर्लेखन करून हस्तलिखित ग्रंथ निर्माण केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, १४ मे रोजी सकाळी ९ वाजता अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात होणार असल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अरविंद गावंडे आणि ग्रंथ लेखक अजय लेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. या वेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशाेमती ठाकूर, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित राहणार आहेत. ग्रंथाकरिता दिल्ली येथून शिवकालीन कागद तयार करून हा भव्य ग्रंथ निर्माण केला आहे. लेंडे यांनी स्वखर्चाने ग्रंथनिर्मिती केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.