आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गजानन महाराज पुण्यतिथी:आदर्श ग्राम वनोजा येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी

वनोजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या वर्षी गुरुवार १ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी व संत गजानन महाराज पुण्यतिथी होती.

मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा फाटा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान वनोजा येथे उसात संपन्न झाली. यावेळी गावातील महिलांनी गावामधून मंदिरापर्यंत पायदळ दिंडी काढत मंदिरावर जाऊन भजनाचा कार्यक्रम घेतला व त्यानंतर आरती करण्यात आली. तसेच ऋषीपंचमीनिमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन गजानन महाराज संस्थेचे संस्थापक मनोहर ब राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष, सदस्य व सर्व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला.

बातम्या आणखी आहेत...