आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुपारच्या वेळी उष्णतामान जास्त असते. जनावरांद्वारे अतिरिक्त काम करून घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या शरीर तापमान नियंत्रण क्षमतेवर होतो. जनावरांच्या गोठ्यामध्ये योग्य व्यवस्थापन करून तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
जिल्ह्यात जवळपास ४ लाख ५० हजारांच्या आसपास पशुधन आहेत. उन्हाच्या झळांनी पशूनांही धोका निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही पशुसंर्धन विभागाने केले आहे. एप्रिल, मे महिन्यात तापमान हे ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्यांचा विपरीत परिणाम हा गायी, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होऊ शकतो.
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमानामुळे जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यास त्याच्या शरीरात या वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानाइट) वाढते. जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक सहन क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते.
एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास जनावरेही उष्माघातास बळी पडतात. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने काही खबरदारीच्या सूचना पशुधनपालकांना दिल्या आहेत.
अशी घ्यावी खबरदारी
सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना जनावरे चरण्यास सोडावीत. मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी द्यावे. बैलांकडून शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी किंवा अन्य कारणाने जनावरे दुपारच्या वेळी भर उन्हात बांधली जातात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी.
उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे त्यांना थंड वातावरणात चारा टाकावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.