आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 बळी गेल्यानंतर प्रशासनाला आली जाग:नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कंटेनरची दुचाकीला धडक बसून युवतीचया झालेल्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी तीन तास रास्ता रोको केला. त्यामुळे डोळे उघडलेल्या प्रशासनाने रविवारपासून नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस महामार्गावरील खड्डे बुजविण्याला सुरूवात केली आहे. - Divya Marathi
खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कंटेनरची दुचाकीला धडक बसून युवतीचया झालेल्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी तीन तास रास्ता रोको केला. त्यामुळे डोळे उघडलेल्या प्रशासनाने रविवारपासून नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस महामार्गावरील खड्डे बुजविण्याला सुरूवात केली आहे.

तालुक्यातील नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस महामार्गावरील खड्डे मागील अनेक दिवसांपासून मृत्यूचे सापळे ठरले आहेत. एकूण 37 बळी घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झाले असून रविवारी (दि. 4) तडकाफडकी खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रशासाने सुरूवात केली आहे. दुसरीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष दिले असते, तर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांनी नाहक 37 बळी घेतले नसते, अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

तालुक्यातील बोरगाव धांदे येथील पोस्ट ऑफीसमध्ये कार्यरत असलेली भुमिका महादेव सोमोसे (24) रा. शेंदरजना खुर्द ही शनिवारी (दि. 3) ही कर्तव्यावर जात असताना भातकुली नजिक रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्ना असलेल्या कंटनेरने तिच्या दुचाकीला (एमएच 27/ सीटी 3192) मागून धडक दिली. त्यात तिचा कंटेनरच्या पुढील चाकात येवून चिरडल्याने जागीच मृत्यू झाला.

महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करीत सुमारे तीन तास चक्का जाम करीत दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली होती, तर दुसरीकडे माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी शिंदे-फडणवीस सरकारने एका आठवड्यात दुसरा बळी घेतल्याची खोचक टिका करून प्रशासनाला अल्टीमेटम सुध्दा दिला होता. एकंदरीत या सर्वप्रकाराने प्रशासन खढबडून जागे झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या वतीने देवगाव- विटाळा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास युध्दस्तरावर सुरूवात झाली आहे.

अधिकाऱ्यांना आरोपी करण्याचा दिला होता इशारा

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याने औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना वारंवार भ्रमणध्वनीवरून खड्डे बुजविण्याबाबत सूचना केली होती. दरम्यान ई-मेल व तीन वेळा पत्र पाठवून सुध्दा अधिकाऱ्यांनी कुठलाच प्रतिसाद न दिल्याने शनिवारी घडलेल्या घटनेनंतर अपघातांच्या घटनांमध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरून आरोपी करण्याचा इशारा दिला होता, अशी प्रतिक्रीया मंगरुळ दस्तगीरचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...