आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंगराचेंगरी प्रकरण:आंध्र प्रदेशात रस्त्यावर मिरवणूक, सभांना बंदी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेश सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गासह इतर रस्त्यांवर जाहीर सभा, मिरवणुका काढण्यास बंदी घातली. गेल्या आठवड्यात तेलगू देसमच्या दोन सभांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनांमध्ये ११ जण दगावले होते.

आदेशानुसार, रस्ते व गल्ल्यांत सभा घेण्याचा हक्क हा १८६१ च्या पोलिस कायद्यातील कलम ३० नुसार कायदा-सुव्यवस्थेचा भाग आहे. लोकांचे ये-जा, आपत्कालीन सेवा, आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीस अडथळा येता कामा नये अशा रस्त्यापासून दूर असलेल्या जागा शोधण्याचे आदेश गृह विभागाचे प्रधान सचिव हरीश गुप्ता यांनी प्रशासन-पोलिसांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...