आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती‎:परिवहन विभागातर्फे बाइक रॅलीद्वारे‎ अमरावतीमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती‎

अमरावती‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक अपघातग्रस्त‎ स्मृतिदिनानिमित्त प्रादेशिक परिवहन ‎कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाविषयक ‎जनजागृतीसाठी शहरात सोमवारी ‎ ‎ दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात‎ ५० परिवहन अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.‎ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या‎ नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम‎ राबवला जातो. या वेळी प्रादेशिक‎ परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते,‎ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज‎ बागडी, सहायक परिवहन अधिकारी‎ सिद्धार्थ ठोके, निरीक्षक वैभव गुल्हाने‎ यांच्यासह अनेक अधिकारी,‎ कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील इर्विन चौक, राजकमल‎ चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक‎ अशा प्रमुख ठिकाणांना रॅलीने भेट‎ देत रस्ता विषयक सुरक्षितता व‎ दक्षतेबाबत जनजागृती करण्यात‎ आली. रॅलीने टोलनाक्यांनाही भेट‎ देऊन रस्ता सुरक्षितता नियमांची‎ पत्रके वाहनचालकांना वाटण्यात‎ आली. रॅलीत परिवहन विभागाचे ५०‎ अधिकारी व कर्मचारी बाइकवर‎ हेल्मेटसह सहभागी झाले होते.‎

नांदगावपेठ टोल नाक्यावर रस्ता‎ सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम झाला. त्यात‎ विविध वाहनचालक, एसटी‎ महामंडळ कर्मचारी व प्रवासी अशा‎ सुमारे १५० व्यक्तींनी सहभाग‎ नोंदवला. या वेळी सर्वांनी दक्षता‎ पालनाबाबत प्रतिज्ञाही घेतली.‎ अपघात टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता‎ नियमांचे संघटितपणे पालन करू या,‎ असे आवाहन या वेळी प्रादेशिक‎ परिवहन अधिकारी गिते यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...