आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनगावात गोडाऊनवर दरोडा:दरोडेखोरांच्या हल्ल्यात व्यापारी, पहारेकरी जखमी; 4 लाखांची रोकड लंपास

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट राष्ट्रीय महामार्गावरील खाऱ्या नाल्या जवळील एका व्यवसायिकाच्या गोडाऊनमध्ये पाच ते सहा अज्ञातांनी प्रवेश करीत तेथे राहत असलेला व्यापारी व रखवालदाराला मारहाण केली.

या वेळी त्यांनी तेथील आलमारीमध्ये ठेवलेले चार लाख रुपये घेवून पळ काढला. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अमरावती येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अब्दुल फारूक अब्दुल रहमान (55) रा. बुधवार सुजी, अंजनगाव असे जखमी वयापाऱ्याचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

खाऱ्या नाल्याजवळ अब्दुल फारूक अब्दुल रहमान यांचे बिल्डिंग मटेरियल आणि जुन्या चार चाकी वाहन विक्रीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्येच ते मालक एका रूममध्ये मुक्कामी असतात. घटनेच्या वेळी व्यापाऱ्यसासह रखवालदार गोडाऊनमध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या पाच ते सहा अज्ञातांनी गोडाऊनचे शटर उघडून रखवालदाराचे हातपाय बांधून त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. अज्ञातांनी शेजारील खोलीत झोपलेले अब्दुल फारूक यांनाही मारहाण करीत अब्दुल रहमान यांना पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी गंभीर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. या वेळी दरोडेखोरांनी आलमारीतील चार लाख रुपयांसह व्यवसायिकाचे दोन, रखवालदाराचा एक मोबाईल, गोडाऊन मधील सीसीटीव्ही कॅमेराचे मेमरी बॉक्स फोडून त्याचे सामान सोबत नेले.

घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रखवालदाराच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखाेरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. लवकरच या प्रकरणाचा शोध लागण्याची शक्यता ठाणेदार दीपक वानखडे यांनी व्यक्त केली.

जाताना पाडले शटर

जाताना दरोडेखोरांनी गोडाऊनचे शटर खाली ओढून घेतले. दरोडेखोर जाताच रखवालदार आशिक अली वल्द मनवर अली (50) रा. सतीपुरा अंजनगाव याने दोरीने बांधलेले स्वतःचे हातपाय सोडून बाजूला असलेल्या संत्र्याच्या मंडीमधील एका परिचिताला माहिती दिली.

श्वान पथकाला केले पाचारण

घटनेचा मागोवा घेत दरोडेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. अंजनगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत माहिती जाणून घेतली.

बातम्या आणखी आहेत...