आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील अकोट राष्ट्रीय महामार्गावरील खाऱ्या नाल्याजवळील एका व्यावसायिकाच्या गोडाउनमध्ये पाच ते सहा अज्ञातांनी प्रवेश करत तेथे राहत असलेला व्यापारी व रखवालदाराला मारहाण केली. या वेळी त्यांनी तेथील आलमारी मध्ये ठेवलेले चार लाख रुपये घेऊन पळ काढला. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अब्दुल फारूक अब्दुल रहमान (५५) रा. बुधवार सुजी, अंजनगाव असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
खाऱ्या नाल्याजवळ अब्दुल फारूक अब्दुल रहमान यांचे बिल्डिंग मटेरियल आणि जुन्या चार चाकी वाहन विक्रीचे गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्येच ते मालक एका रूममध्ये मुक्कामी असतात. घटनेच्या वेळी व्यापाऱ्यांसह रखवालदार गोडाउनमध्ये झोपले होते. मध्यरात्री पाच ते सहा अज्ञातांनी गोडाऊनचे शटर उघडून रखवालदाराचे हातपाय बांधून त्याला लोखंडी टाॅमीने मारहाण केली. अज्ञातांनी शेजारील खोलीत झोपलेले अब्दुल फारूक यांनाही मारहाण करीत अब्दुल रहमान(वय ५५) यांना पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी गंभीर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
या वेळी दरोडेखोरांनी आलमारीतील चार लाख रुपयांसह व्यवसायिकाचे दोन, रखवालदाराचा एक मोबाइल, गोडाऊन मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मेमरी बॉक्स फोडून त्याचे सामान सोबत नेले. घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रखवालदाराच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. लवकरच या प्रकरणाचा शोध लागण्याची शक्यता ठाणेदार दीपक वानखडे यांनी व्यक्त केली.
जाताना पाडले शटर जाताना दरोडेखोरांनी गोडाऊनचे शटर खाली ओढून घेतले. दरोडेखोर जाताच रखवालदार आशिक अली वल्द मनवर अली (५०) रा. सतीपुरा अंजनगाव याने दोरीने बांधलेले स्वतःचे हातपाय सोडून बाजूला असलेल्या संत्र्याच्या मंडीमधील एका परिचिताला माहिती दिली.
श्वान पथकाला केले घटनास्थळी पाचारण घटनेचा मागोवा घेत दरोडेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. अंजनगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत माहिती जाणून घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.